naralache niyojan coconut plant cultivation planning
नारळ हे बागायती फळझाड आहे, पाण्याची सोय झाल्यास कुठल्याही प्रकारच्या जमीनीत लागवड करता येते. नारळासाठी खड्डा भरणे: सर्वसाधरण 1x1x1 मीटर आकारचे खड्डे खोदा.खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिने आधी पूर्ण करावेत. रेताड, वरकस आणि मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळाशी कमीत कमी 1 ते 2 टोपल्या चागल्या प्रतीची माती टाकावी. खड्डा भरताना आणखी 1 ते 2 टोपल्या चांगल्या प्रतीची माती मिसळावी. त्यामुळे जमिनीत माती धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पावसाळ्यात अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी जमिनीत खड्ड्याच्या तळाला 1 ते 2 टोपल्या रेती (वाळू) घालावी. तसेच खड्डा भरताना 1 ते 2 टोपल्या रेती मिसळावी, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करता येईल. खड्डा भरताना वरील थरात चांगली माती/वाळू 4 ते 5 घमेली कुजलेले शेणखत/कंपोस्ट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्पेट, 100 ग्रॅम फॉलीडॉल पावडर खड्डा वापरून खड्डा पूर्ण भरावा. पाणी साचून राहत नसलेल्या जमिनीत पृष्ठभागापर्यंत भरावा. परंतु पाणी साचणाऱ्या जमिनीत उंचवटे करावेत. लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वया...