मुलांमध्ये हिंसक वर्तनाची कारणे, परिणाम, घ्यावयाची काळजी आणि उपाय
**मुलांमध्ये हिंसक वर्तनाची कारणे, परिणाम, घ्यावयाची काळजी आणि उपाय** मुलांमध्ये हिंसक वर्तनाची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये पालकत्वापासून ते खाण्यापिण्यापर्यंत जबाबदारी असते. तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या हिंसक वर्तनाची कारणे कोणती? मुलांमध्ये हिंसक वर्तनाची लक्षणे काय आहेत? हिंसक वर्तन कसे थांबवता येईल? याबाबत पालकांना माहिती असणे गरजेचे आहे. गेल्या काही काळापासून देशाविदेशात अशा अनेक हिंसक घटना ( Many violent incidents ) घडत आहेत, ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. नुकतेच एक अतिशय हिंसक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका 16 वर्षांच्या मुलाने आपल्या आईची हत्या केली आहे आणि कारण काय तर आईने ऑनलाइन मोबाईल गेम खेळू फिल नाही.मग या अशा घटनांवर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आजचे ऑनलाइन गेम्स म्हणजे खेळच हिंसक आहेत. हे ऑनलाइन खेळ खेळणारे मूल वास्तव आणि आभासी जग यात फरक करू शकत नाही आणि ते स्वतःला त्या आभासी/वर्चुअल जगाचा एक भाग समजते. आणि तज्ज्ञांच्या मतानुसार ह्यास पालकत्व, आहार, जीवनशैली, मित्र जबाबदार आहेत.अशा वागण्याने मुलाच्या मनाचे नैसर्गिक जीवन पूर्णपणे नष्ट होऊ शकते. मुलांच्या हिंस...