Posts

Showing posts with the label विपुल दयाघन गर्जे तव ह्रदयांबरिं श्रीरेणुके हो

विपुल दयाघन गर्जे तव ह्रदयांबरिं श्रीरेणुके हो

विपुल दयाघन गर्जे तव ह्रदयांबरिं श्रीरेणुके हो विपुल दयाघन गर्जे तव ह्रदयांबरिं श्रीरेणुके हो । पळभर नर - मोराची करुणावाणी ही आयके हो ॥धृ०॥ श्रमलिस खेळुनि नाचुनि गोंधळ घालुनि ब्रह्मांगणीं हो ।    निजलिस कशि दिनांची चिंता सोडुनि अंतः करणीं हो । उठ लवकर जगदंबे, त्रैलोक्याची तूं स्वामिणी हो । विधि - हरि - हर अज्ञानी, पूर्णज्ञानी तूं शाहणी हो । समर्थ परमेश्वरि तूं, अनंत ब्रह्मांडनायके हो ॥१॥ शरणागत मी आलों, परि बहु चुकलों बोलावया हो । तुज जननीचें नातें लाज न वाटे लावावया हो । परि तूं जननि दिनांची, अनाथांची बहु तुज दया हो । ही श्रुति सत्याऽसत्य कीं, अनुभव आलों मी पहावया हो । कळेल तैसें करि, परि निज ब्रीद रक्षी मां पालके हो ॥२॥ भवगदें पिडलों भारी, मजला दुःख हें सोसेना हो । अझुनी अंबे, तुजला माझी करुणा कां येइ ना हो । तारी अथवा मारी, धरिलें चरण मी सोडिना हो । कृपा केल्यावांचुनी परतुनि विन्मुख मी जाइ ना हो । तुजविण जगिं कोणाचें वद पद प्रार्थावे अंबिके हो ॥३॥ ऐकुनि करुणावाणी ह्रदयीं सप्रेमें द्रवली हो । प्रसन्नमुख जगदंबा, अंबा, प्रसन्न जाहली हो । अजरामर वर द्याया, प्रकटुनि पुढें उभी रा...