Durge durghat bhari durga devi arti
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥ त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही । चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥ साही विवाद करितां पडिले प्रवाही । ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥ प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥ अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥