Posts

Showing posts with the label बक्षिस पत्र bakshis patr sampurn mahiti gift deed

bakshis patr sampurn mahiti gift deed बक्षिस पत्र

Image
Ask in detail --> " बक्षीस पत्र महत्वाची माहिती " जमिनीचे किंवा शेतीचे किंवा संपत्तीचे हस्तांतरण करताना बऱ्याच अडचणी येतात, नात्यातील तणाव आणि बरेच हेवेदावे आडवे येऊ शकतात. विशेष करून शेती सम्बन्धीत सात बारा वर नावे लावणे , वाटण्या करणे हे प्रकार बरेच त्रासदायक आणि खर्चिक ठरू शकतात.  तलाठ्यां कडून किंवा तहसील कडून फेरफार करणे खूप खर्चिक आणि वेळखाऊ होत आहे.  पण ह्या किचकट प्रक्रियेतून मुक्ती देणारा एक सोपा पर्याय म्हणजे बक्षीस पत्र . बक्षीस पत्र म्हणजेच "गिफ्ट डिड" हा मिळकतीमधील  मालकी हक्क  हस्तांतरित करण्याचा एक लोकप्रिय  कागदपत्र आहे.  हयाची अंमलबजावणी ही संबंधित व्यक्तींच्या  हयातीत होते. स्वकष्टाने कमावलेली , स्वतःच्या मालकिची व अस्तित्वात असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षिस पत्राने हस्तांतरित म्हणजेच ट्रान्सफर  करता येते. बक्षीस पत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीस  "डोनर" (दाता ) तर ज्याच्या ते लिहून दिले जाते त्या व्यक्तीस "डोनी" (लाभार्थी) असे म्हणतात. बक्षीस पत्र हे "विना-मोबदलाच" असते, "कंडिशनल" बक्षीस पत्र देखील करता य