तुकाराम महाराज राम अभंग अवतार सूर्यवंशी दिव्या घेतला स्वामी
तुकाराम महाराजांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्यावर लिहिलेला अभंग अवतार सूर्यवंशीं दिव्य घेतला स्वामी । एकपत्नी व्रत करुनि राहिला नेमी । मर्दिलें ताटिकेसी सुख वाटलें भूमी । रक्षोनी यज्ञ केला कीर्ति प्रख्यात नामीं ॥१॥ जयदेवा रघुनाथा जय जानकीकांता । आरती ओंवाळीन तुजलागीं समर्था ॥२॥ विदेही राजयानें पण केलासे भारी । तें शिवचाप मोठें मोडुनियां सत्वरीं । वरिलें जानकीसी आदिशक्ति सुंदरी । जिंकुनी भार्गवाला बहु दाविली परी ॥३॥ पाळोनी पितृवाक्य मग सेविलें वन । हिंडतां पादचारी मुक्त तृण पाषाण । मर्दिले दुष्ट भारी दैत्य खरदूषण । तोषले सर्व ऋषि त्यांसि दिलें दर्शन ॥४॥ जानकी लक्ष्मणासहित चालतां त्वरें । भेटली भिल्लटी ती तिचीं उच्छिष्ट बोरें । भक्षुनी उद्धरिले कबंधादि अपार । देखिली पंचवटी तेथें केला विहार ॥५॥ पातली शूर्पणखा तिचें छेदिलें नाक । जाउनी रावणासी सांगे सकळ दुःख । तेथोनी पातला तो मायामारीच देख । पाहतां जानकीसी तेव्हां वाटलें सुख ॥६॥ तें चर्म आणावया राम धांवतां मागें । रावणें जानकीसी नेलें लंकेसी वेगें । मागुता राम येतां सीता न दिसे चांग । तें दुःख ठाकुनियां हृदय झालें भंग ॥७॥ धुंडितां जानकीसी