Posts

Showing posts with the label नित्य हरिपाठ

🚩🕉️🙏 नित्य हरिपाठ 🚩🕉️🙏 haripath

Image
🕉️🚩 दैनंदिन हरिपाठ 🕉️🚩 जय जय राम कृष्ण हरी अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र | तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र | तया आठविता महापुण्यराशी| नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी || रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥ तो हा विठ्ठल बरवा  तो हा माधव बरवा  *****विठोबा रुखमाई जय जय विठोबा रुखमाई**** सुंदर ते ध्यान उभे विटेवरी| कर कटावरी ठेवोनिया      ||१|| तुळशीहार गळा कासे पितांबर  आवडे निरंतर हेचि ध्यान.  ||२|| मकर कुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणी विराजित||३|| तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहिन श्रीमुख आवडीने.    || श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥ राजयाची कांता काय भीक मागे । मनाचियां जोगे सिद्धी पावे ॥२॥ कल्पतरु तळवटीं जो कोणी बैसला । काय उणे त्याला सांगिजो जी ॥३॥ ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों । आतां उद्धरिलों गुरुकृपे ॥४॥ राजयाची कांता काय भीक मागे...