गणेशोत्सवाचे स्वरूप असे का झाले??? ganeshotsav ganapati utsav swarup svarup badal pradushan plastar of paris idol murti pollution गणेशोत्सवाचे स्वरूप असे का झाले???
सर्वच नाही पण अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि तिथे वाजणारी सिनेमाची अल्बमची अश्लील गाणी, पत्ते कॅरोम आणि बरेच अन्य प्रकार, पुड्या तंबाखू घुटका खाऊन थुंकणारे कार्यकर्ते हे चित्र तुम्ही पाहिले आहे का??? मग प्रश्न पडतो की घरोघरी किंवा मंदिरात साजरा केला जाणारा देवाचा उत्सव सार्वजनिक का केला?? मुघल ब्रिटिश अन्य बरीच विदेशी आक्रमणे झाली, शेकडो वर्षे भारत गुलामीत होता. प्रचंड अत्याचार अन्याय हत्याकांड झाली मंदिरे उध्वस्त केली गेली आणि मुर्त्या वाचवण्यासाठी मुर्त्या व सणवार घरात न्यावी लागली आणि ह्या सर्वांची परिणीती अशी झाली की भारतीय समाज एकत्र होणे प्रतिकार करणे सामूहिक रित्या काही तरी कार्य करणे हे भीती पोटी टाळू लागला. हे सर्व लोकमान्य टिळकांनी बघितले आणि ठरवले की सर्वांना आता घराबाहेर आणणे आणि एकत्र करणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला, खूप पवित्र उद्देश होता आणि त्या काळात त्याचे चांगले परिणाम दिसले देखील. गल्लोगल्ली मध्ये चौकाचौकात शहराशहरांत गणेश मंडळांनी गणपतीची स्थपणा केली , सर्व जण एकत्र जमून देवाची सामूहिक प्रार्थना करू लागले आणि ...