गणेशोत्सवाचे स्वरूप असे का झाले??? ganeshotsav ganapati utsav swarup svarup badal pradushan plastar of paris idol murti pollution गणेशोत्सवाचे स्वरूप असे का झाले???
सर्वच नाही पण अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि तिथे वाजणारी सिनेमाची अल्बमची अश्लील गाणी, पत्ते कॅरोम आणि बरेच अन्य प्रकार, पुड्या तंबाखू घुटका खाऊन थुंकणारे कार्यकर्ते हे चित्र तुम्ही पाहिले आहे का??? मग प्रश्न पडतो की घरोघरी किंवा मंदिरात साजरा केला जाणारा देवाचा उत्सव सार्वजनिक का केला??
मुघल ब्रिटिश अन्य बरीच विदेशी आक्रमणे झाली, शेकडो वर्षे भारत गुलामीत होता. प्रचंड अत्याचार अन्याय हत्याकांड झाली मंदिरे उध्वस्त केली गेली आणि मुर्त्या वाचवण्यासाठी मुर्त्या व सणवार घरात न्यावी लागली आणि ह्या सर्वांची परिणीती अशी झाली की भारतीय समाज एकत्र होणे प्रतिकार करणे सामूहिक रित्या काही तरी कार्य करणे हे भीती पोटी टाळू लागला. हे सर्व लोकमान्य टिळकांनी बघितले आणि ठरवले की सर्वांना आता घराबाहेर आणणे आणि एकत्र करणे आवश्यक आहे.
लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला, खूप पवित्र उद्देश होता आणि त्या काळात त्याचे चांगले परिणाम दिसले देखील. गल्लोगल्ली मध्ये चौकाचौकात शहराशहरांत गणेश मंडळांनी गणपतीची स्थपणा केली , सर्व जण एकत्र जमून देवाची सामूहिक प्रार्थना करू लागले आणि पारतंत्र्याच्या त्या काळात बरेच उद्देश हे ह्या सार्वजनिक उत्सवातून साध्य झाले आणि आपल्याला स्वातंत्र्याची पहाट दिसली.
पण आज बऱ्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि सिनेमाची अल्बमची अश्लील गाणी, पत्ते ,कॅरम आणि बरेच अन्य प्रकार, पुड्या तंबाखू घुटका खाऊन थुंकणारे कार्यकर्ते असे चित्र का दिसते?? मोठमोठ्या प्लास्टर च्या मुर्त्या घेण्याची स्पर्धा का केली जाते, आणि ह्या सर्व खर्चिक गोष्टींसाठी लोकांकडून देणगी च्या नावाखाली खडणीप्रमाणे जबरदस्ती केली जाणारी वसुली?? विसर्जनाच्या दिवशी जणू कुठे तरी मूर्ती टाकली आणि झाले मोकळे अशी घाणेरडी विचारसरणी का?? विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जाऊन बघा त्या तलावात विहिरीत नदीत किंवा समुद्र किनारी , मूर्तीचे तुटलेले हात पाय मुंडके, हे सर्व बघून आपणा गणेशभक्तांना चीड का येत नाही?? ज्याला पूजतो त्याचेच हाल होताना दिसत नाहीत का?? आपण निसर्गपूजक असून देखील सुद्धा निसर्गपुरक मातीच्या मुर्त्या का वापरत नाहीत?
आता एक साधा प्रश्न, तुम्ही कधी ह्या सर्व गोष्टी इतर धर्माच्या प्रार्थनास्थळात किंवा प्रार्थनास्थळाच्या जवळ सुद्धा बघितले आहेत का?? स्पष्टच बोलायचे तर आपणच सांगा मस्जिद मध्ये किंवा चर्च मध्ये किंवा गुरुद्वाऱ्यात कधी सिनेमाचे गाणे वाजलेत किंवा तिथे पत्ते खेळलेत अशी कल्पना सुद्धा करू शकता का?? त्याउलट आपणच म्हणतो की त्यांच्या धर्मात खूप शिस्त आहे .
आपणच आपल्या धर्माची देवाची संस्कृतीची अब्रू का काढतोय? एक सशक्त स्वयंशिस्त हिंदू समाजाची रचना करण्याऐवजी आपण आपल्याच समाजाला कमकुवत का करत आहोत?? आधीच आपले लोक सामूहिक प्रार्थना करताना फारसे दिसत नाही, त्यात गाणे पत्ते चेकाळलेले कार्यकर्ते ह्या सर्व प्रकारांमुळे सामान्य हिंदू महिला पुरुष हे ह्या सर्व प्रकारांपासून फारकत घेताना दिसतात.
सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशी नाही, पण बऱ्यापैकी तशीच आहेत. पुण्यातील काही मंडळे अतिशय स्तुत्य उपक्रम करतात जसे की सामूहिक प्रार्थना , जाज्वल्य इतिहासाची शिकवण देणारे उपक्रम आणि बरेच काही. पण बरेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे सर्व करताना दिसत नाहीत, विशेषकरून ग्रामीण भागातील आणि अति शहरी भागातील मंडळे. ज्या देवाच्या आशीर्वादाने आपला श्वासोच्छ्वास चालू आहे त्याच देवासमोर जर आपण सिनेमाची अश्लील गाणी लावणार असू तर ह्यापेक्षा निंदनीय प्रकार कोणता नाही, देव तर तथास्तु करत असतोच न.
तेव्हा सर्व हिंदू धर्माचे पालनकरत्यांनी हे आवर्जून लक्षात घ्यावे की आपण आपल्या देवाची धर्माची संस्कृतीची चेष्टा अपमान होणार नाही ह्याची तंतोतंत काळजी घेतली पाहिजे. 🕉️🚩जाज्वल्य गौरवशाली इतिहास आपल्या महापुरुषांच्या शौर्याची महती सांगणारी व्याख्याने किर्तने पोवाडे भाषणे असे उपक्रम ठेवले पाहिजेत.🕉️🚩 धर्म संस्कृती उत्सव कसा वृद्धींगत होईल ह्याची योजना केली पाहिजे. आपल्यात विषारी जातीवाद पासरवणाऱ्या संघटना आणि त्यांची विषारी विचारसरणी मोडून काढली पाहिजे. ज्याच्या मनात एकमेकांच्या जातीबद्दल द्वेष असेल तर तो हिंदू कसला. अतिशय प्रखर हिंदूत्व जागृत करून आपल्या भारताच्या संस्कृतीच्या धर्माच्या मानवतेच्या सुरक्षित भाविष्यसाठी झटले पाहिजे. जेंव्हा सर्व भारतीय समाजाची व्यक्तींची अशी भावना होईल तेंव्हा हे समजून घ्या की आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षीत आहे.
अगदी बरोबर आहे 🙏
ReplyDeleteTrue👆
ReplyDelete