sant dnyaneshwar maharaj arti gnyaneshwar श्री ज्ञानदेवाची आरती
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा || धृ || लोपलें ज्ञान जगी |हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |नाम ठेविले ज्ञानी || १ || कनकाचे ताट करी |उभ्या गोपिका नारी | नारद तुंबर हो |साम गायन करी || २ || प्रकट गुह्य बोले |विश्र्व ब्रम्हाची केलें | रामजनार्दनी |पायी मस्तक ठेविले | आरती ज्ञानराजा |महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||