छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य chatrapati shivaji maharaj yanche hindavi swarajya
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य सैनिकांबद्दल मावळ्यांबद्दल पसरविले जाणारे गैरसमज आणि त्याची उत्तरे प्रश्न.शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता...? …. "इब्राहीम खान"...! चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत 1761 युद्धातील तोफखान्याचा प्रमुख होता. प्रश्न.शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ? "दौलत खान"....! चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान नावाचा एक सैनिक होता पण तो कान्होजी आंग्रेच्या हाताखाली. प्रश्न.शिवाजी महाराजांच्या घोड-दलाचा प्रमुख कोण होता.? "सिद्दी हिलाल"....! चूक - सिद्दी हिलाल हा एक सैनिक होता पण घोडदळाचा प्रमुख नव्हता प्रश्न.शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता ? "नूर खान"…. ! चूक - पहिले सरसेनापती होते बाजी पासलकर. अन्य प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते आणि खंडेराव कदम होते.नुरखान खान हे नाव आले कुठून हाच मोठा प्रश्न आहे. प्रश्न.शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला--- "मदारी मेहतर" मदारी होता पण तो महाराजांबरोबर आलेल्...