सायबर सुरक्षा अवेअरनेस रॅली प्रसिद्धी पत्रक पत्रकारांकरीत
दि. 00/00/2026 इंदुरा इंग्लिश CBSE स्कूलतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती रॅली आयोजन वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील नामांकित शाळा इंदुरा इंग्लिश CBSE स्कूल यांच्या तर्फे जानेवारी महिन्यात सायबर अवेअरनेस पोस्टर मेकिंग स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ड्रॉइंग च्य माध्यमातून किंवा डिजिटल क्रिएटिव्हिटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सायबर अवेअरनेस संदर्भात पोस्टर्स बनवली. इयत्ता चौथी पासून नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ह्या पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांमधून निवडक अशा पोस्टर्स नी सायबर अवेअरनेस रॅलीत सहभागासाठी स्थान पटकावले. अमुकअमुक रोजी शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सायबर सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले . सदरील रॅली अमुक रोड ते अमुक चौक या मुख्य मार्गाने काढण्यात येत आहे. सायबर सुरक्षा ही काळाची गरज आहे हे सागण्यासाठी इयत्ता चवथी ते नववी विद्याध्थ्यांनी मोठ्या संख्येनी यात सहभाग नोंदवला होता. या रॅलीच्या माध्यमातून सायबर गुन्हयांपासून संरक्षण, ऑनलाईन फसवणूक टाळणे, बनावट एस एम. एस. नोकरीचे आमिष, डेटा चोरी, बनावट...