सायबर सुरक्षा अवेअरनेस रॅली प्रसिद्धी पत्रक पत्रकारांकरीत

दि. 00/00/2026

इंदुरा इंग्लिश CBSE स्कूलतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती रॅली आयोजन

वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील नामांकित शाळा इंदुरा इंग्लिश CBSE स्कूल यांच्या तर्फे जानेवारी महिन्यात सायबर अवेअरनेस पोस्टर मेकिंग स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ड्रॉइंग च्य माध्यमातून किंवा डिजिटल क्रिएटिव्हिटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सायबर अवेअरनेस संदर्भात पोस्टर्स बनवली. 

 इयत्ता चौथी पासून नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ह्या पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांमधून निवडक अशा पोस्टर्स नी सायबर अवेअरनेस रॅलीत सहभागासाठी स्थान पटकावले. अमुकअमुक रोजी शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सायबर सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले . सदरील रॅली अमुक रोड ते अमुक चौक या मुख्य मार्गाने काढण्यात येत आहे. 

सायबर सुरक्षा ही काळाची गरज आहे हे सागण्यासाठी इयत्ता चवथी ते नववी विद्याध्थ्यांनी मोठ्या संख्येनी यात सहभाग नोंदवला होता.

या रॅलीच्या माध्यमातून सायबर गुन्हयांपासून संरक्षण, ऑनलाईन फसवणूक टाळणे, बनावट एस एम. एस. नोकरीचे आमिष, डेटा चोरी, बनावट कॉल, फिशिंग, स्पॅम यापासून बचाव करणे व वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या हातातील फलकांमार्फत घोषणा देत नागरिकांना पासवर्ड मजबूत करा, अनोळखी लिंकवर क्लिक करु नका, स्वतःचे ओटिपी कोणाशीही शेअर करू नका, कशावरही क्लिक करण्यापूवी विचार करा, आज सुरक्षित करा -उद्या सुरक्षित रहा, लॉक करा आणि बचाव करा, अपडेट करा आणि सुरक्षित रहा अशी फलके झळकावून जनजागृती केली.

 शाळेचे संचालक श्री कैलास पानखेडे, सचिव जयश्री पनखेडे मॅडम, मुख्याध्यापक भैरवनाथ तांबरे सर, उपप्राचार्य संतोष खाकरे सर तसेच संगणक विभागाचे शिक्षक आशिष शिवाजीराव कुलकर्णी सर, कृष्णा कदम सर, ड्रॉईंग टीचर नरवाडे सर, स्पोर्ट्स टीचर निसार सर या सर्वांनी सदरील रॅलीस यशस्वी करत विभागातील जनतेमध्ये सायबर सुरक्षेचे महत्व पटवून दिले.

Comments

Popular posts from this blog