bakshis patr sampurn mahiti gift deed बक्षिस पत्र
Ask in detail --> " बक्षीस पत्र महत्वाची माहिती "
जमिनीचे किंवा शेतीचे किंवा संपत्तीचे हस्तांतरण करताना बऱ्याच अडचणी येतात, नात्यातील तणाव आणि बरेच हेवेदावे आडवे येऊ शकतात. विशेष करून शेती सम्बन्धीत सात बारा वर नावे लावणे , वाटण्या करणे हे प्रकार बरेच त्रासदायक आणि खर्चिक ठरू शकतात. तलाठ्यां कडून किंवा तहसील कडून फेरफार करणे खूप खर्चिक आणि वेळखाऊ होत आहे.
पण ह्या किचकट प्रक्रियेतून मुक्ती देणारा एक सोपा पर्याय म्हणजे बक्षीस पत्र .
बक्षीस पत्र म्हणजेच "गिफ्ट डिड" हा मिळकतीमधील मालकी हक्क हस्तांतरित करण्याचा एक लोकप्रिय कागदपत्र आहे. हयाची अंमलबजावणी ही संबंधित व्यक्तींच्या हयातीत होते.
स्वकष्टाने कमावलेली , स्वतःच्या मालकिची व अस्तित्वात असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षिस पत्राने हस्तांतरित म्हणजेच ट्रान्सफर करता येते.
बक्षीस पत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीस "डोनर" (दाता ) तर ज्याच्या ते लिहून दिले जाते त्या व्यक्तीस "डोनी" (लाभार्थी) असे म्हणतात.
बक्षीस पत्र हे "विना-मोबदलाच" असते, "कंडिशनल" बक्षीस पत्र देखील करता येते.
स्थावर (इममुव्हेबल) मिळकतीचे बक्षीसपत्र हे नोंदणीकृत करणे म्हणजेच "रजिस्टर" करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यावर डोनर, तसेच २ साक्षीदारांनी सही करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे डोनीने देखील "बक्षीस पात्र मान्य आहे" असे लिहून सही करणे आवश्यक आहे. सर्व पूर्तता झाली की बक्षीस पत्राद्वारे मालकी हक्क तात्काळ हस्तांतरित होतो.
बक्षीसपत्राद्वारे मिळकत द्यायची असेल तर त्या मिळकतीच्या बाजारभावाच्या तीन टक्के इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. मात्र जर सदरील मिळकत ही राहण्याची किंवा शेतीची असेल आणि बक्षीस पत्राद्वारे ती मिळकत नवरा, बायको, मुलगा, मुलगी, नातू, नात, मृत मुलाची पत्नी ह्यापैकी कोणाला द्यायची असेल तर केवळ दोनशे रुपये इतकीच स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. ५०० रुपयांचा बॉंड करावा लागतो.
बक्षिस पत्र 'अपवादात्मक' परिस्थितीमध्येच रद्द करता येते. जर एखादी विशिष्ट गोष्ट घडली तर बक्षीस पत्र रद्द होईल, असे जर डोनर आणि डोनी ह्यांनी ठरविले असेल आणि तशी गोष्ट घडली तरच बक्षिस पत्र रद्द होऊ शकते.
पण ही गोष्ट अथवा अट डोनर च्या नियंत्रणात नसावी.
Comments
Post a Comment