मुलांमध्ये हिंसक वर्तनाची कारणे, परिणाम, घ्यावयाची काळजी आणि उपाय

**मुलांमध्ये हिंसक वर्तनाची कारणे, परिणाम, घ्यावयाची काळजी आणि उपाय**


मुलांमध्ये हिंसक वर्तनाची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये पालकत्वापासून ते खाण्यापिण्यापर्यंत जबाबदारी असते. तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या हिंसक वर्तनाची कारणे कोणती? मुलांमध्ये हिंसक वर्तनाची लक्षणे काय आहेत? हिंसक वर्तन कसे थांबवता येईल? याबाबत पालकांना माहिती असणे गरजेचे आहे.


गेल्या काही काळापासून देशाविदेशात अशा अनेक हिंसक घटना (Many violent incidents) घडत आहेत, ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. नुकतेच एक अतिशय हिंसक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका 16 वर्षांच्या मुलाने आपल्या आईची हत्या केली आहे आणि कारण काय तर आईने ऑनलाइन मोबाईल गेम खेळू फिल नाही.मग या अशा घटनांवर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आजचे ऑनलाइन गेम्स म्हणजे खेळच हिंसक आहेत. हे ऑनलाइन खेळ खेळणारे मूल वास्तव आणि आभासी जग यात फरक करू शकत नाही आणि ते स्वतःला त्या आभासी/वर्चुअल जगाचा एक भाग समजते. आणि तज्ज्ञांच्या मतानुसार ह्यास पालकत्व, आहार, जीवनशैली, मित्र जबाबदार आहेत.अशा वागण्याने मुलाच्या मनाचे नैसर्गिक जीवन पूर्णपणे नष्ट होऊ शकते. मुलांच्या हिंसक वर्तनाची (violent behavior) अनेक कारणे असू शकतात आणि भविष्यात त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात. ही हिंसक वर्तणूक मनोरुग्ण स्थिती, वैद्यकीय समस्या आणि जीवनातील समस्या (Problems in life) देखील सूचित करतात, म्हणून पालकांनी मुलाच्या हिंसक वर्तनाचे कारण जाणून घेतले पाहिजे आणि ते टाळण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत. ह्या सर्वाचा उहापोह करण्याचा छोटासा प्रयत्न.

मुलांमध्ये हिंसक वर्तन

सर्वात पहिले आपण पालक म्हणून मुलांचे हिंसक वर्तन लक्षात आल्यानंतर त्याची वेळीच दखल न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे समजून घेतलेच पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मुलांच्या वयानुसार, त्यांचे हिंसक वर्तन एखाद्याला मारणे, ओरडणे, बोलल्यावर राग येणे, अगदी गुन्हेगारी कृत्येही असू शकते. मुलांच्या संपर्कात आलेले काही घटक त्यांचे हिंसक वर्तन आणखी वाढवू शकतात. कोणत्याही वयात मुलांच्या हिंसक वागणुकीकडे दुर्लक्ष करू नये, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

मुलांमध्ये हिंसक वर्तनाची पुढीलप्रमाणे काही  चिन्हे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात ती पुढीलप्रमाणे 

– वारंवार राग दाखवणे
– समजावूनही राग येणे
– काहीही समजावून सांगताना वस्तू फेकणे
– पालकांना मारण्यासाठी धावणे
– लोकांबद्दल वाईट बोलणे
– असभ्य भाषा वापरणे
– वाईट सवयी लागणे
– भावंडांबद्दल आपुलकी ठेवू नका
– लढण्याची वृत्ती असणे
– नेहमी उदास राहाणे
– संवेदनशील आणि चिडखोर असणे
– वारंवार उत्तेजीत होणे


आत्ताच आपण बघितलेल्या हिंसक वर्तनाची हिंसक वृत्तीच्या पाठीमागची कारणे शोधण्याचा आपण केलेला प्रयत्न

1) घरातील वातावरणाचा अभाव : पालकांकडून मुलांची योग्य काळजी घेतली जात नाही, त्यामुळे मुलांना घरचे वातावरण मिळत नाही आणि ते हिंसक बनतात.
2) भावनिक आघात किंवा तणाव: कधीकधी, काही क्लेशकारक घटना किंवा तणावामुळे, सतत तणाव असतो, ज्यामुळे मुलांचे वर्तन हिंसक होऊ लागते.
3) मुलांची धमकावणे: मुलांना कोणत्याही प्रकारे धमकावले जात असले तरी त्यांचे वर्तन आक्रमक असू शकते.
4) कौटुंबिक समस्या: जर एखाद्याच्या कुटुंबात हिंसाचार आधीच झाला असेल तर त्याचा मुलांवर वाईट परिणाम होतो आणि नंतर ते हिंसक बनतात.
5) औषधांचे सेवन: दारू आणि इतर चुकीच्या गोष्टींचे सेवन केल्याने मुलांमध्ये आक्रमकता वाढते.
6) हिंसा पाहणे: कधीकधी टीव्हीवर हिंसक कार्यक्रम पाहिल्याने मुलांमध्ये हिंसक वर्तन वाढते.
7) घरात शस्त्रे दिसणे : घरात सतत बंदुका, चाकू इत्यादी दिसल्यानेही मुलांचे वर्तन हिंसक बनते.
8) हिंसक व्हिडिओ गेम खेळणे: तज्ज्ञांचे मत आहे की व्हिडिओ गेम शूट केल्याने मुलांच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो.
9) मानसिक स्थिती: बर्याच प्रकरणांमध्ये, बायपोलर डिसऑर्डर, चिंता, नैराश्याची प्रकरणे देखील मुलांमध्ये दिसतात. या काही मानसिक आरोग्य स्थिती आहेत ज्यामुळे हिंसक आणि आक्रमक वर्तन वाढू शकते.

१०) ह्या सर्वांच्याया मुळाशी घरात धार्मिक सांस्कृतिक अध्यात्मिक वातावरण नसणे हे असल्याचेही तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. 

मुलाने हिंसक वर्तन केल्यास काय करावे?

जेव्हा जेव्हा पालक किंवा घरातील इतर सदस्यांना त्यांचे मूल किंवा भावंड मूल हिंसक वर्तन करत असल्याचे दिसले तेव्हा त्यांना ताबडतोब मानसिक आरोग्य तज्ञाकडे नेले पाहिजे. व्यावसायिक डॉक्टरांद्वारे उपचार केल्याने त्याच्या वर्तनावर मात करण्यास मदत होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवणे, मनाच्या गोष्टी सांगणे, भांडणे करणे, नकारात्मक गोष्टी काढून टाकणे, सकारात्मक गोष्टींचा विचार करणे इत्यादी गोष्टी मानसिक आरोग्य तज्ञांद्वारे मुलांना सांगता येतील. याशिवाय खाली नमूद केलेल्या पद्धती देखील हिंसक वर्तन कमी करण्यास मदत करू शकतात.
– घरातील वातावरण चांगले तयार करणे, घरात धार्मिक सांस्कृतिक अध्यात्मिक वातावरण असणे

– मुलांचे मन जाणून घेणे
– मुलांशी बोलणे आणि समजून घेणे
मुलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
– लैंगिक शिक्षण
– मुलांचे मोबाईल-टॅबलेट तपासणे
– नैसर्गिक ठिकाणी फेरफटका मारणे
– चांगल्या गोष्टी दाखवण्याची प्रेरणा
– पुस्तके वाचण्याची सवय लावा
– मुलांनी चुका केल्यानंतर त्यांच्यावर आक्रमक न होणे

मुलांशी बोलताना आपली भाषा, वर्तणूक एकंदरीत आपला घरातील वावर शांत आनंदी असावा.

एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, वयाच्या 10 व्या वर्षी मुलांची सोशल मीडियावरील सक्रियता झपाट्याने वाढली आहे. ही मुलं दररोज सुमारे पाच तास सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यासाठी दिवसभरात तीन तास तर रात्री दोन तास खर्च होतात.

सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे लहान मुलं प्रसिद्ध व्यक्तींमुळे प्रभावित होतात आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटला फॉलो करतात. तसेच मुलांना आपले इतर मित्र काय करतात हेही जाणून घ्यायचं असतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट रहायचं असतं.

अनेकदा गेम खेळण्यासाठीही मुलांकडून स्मार्ट फोनचा वापर केला जात आहे. मुलांना गेम खेळण्याचे व्यसन लागल्यामुळे ते तासनतास फोनवर घालवत असल्याची अनेक प्रकरणं पाहायला मिळत आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थित असताना हे प्रकार अधिक घडत आहेत.


सोशल मीडियाचे लागलेले व्यसन मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. ते वारंवार आपले फेसबूक आणि इन्स्टाग्राम चेक करत असतात. सोशल अकाऊंट वारंवार बघण्याची ही सवय मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकते

1 कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे (corona) सर्वजण घरी होतो. लहान मुलंही बराच काळ घरात बसून होती. त्यात त्यांचा अभ्यासही ऑनलाइन पद्धतीने होत होता, ज्यासाठी मुलांना बराच काळ स्मार्टफोन आणि लॅपटॉपचा वापर करावा लागला. बाहेर जाता येत नसल्याने मुलांनी अभ्यासाशिवाय मनोरंजनासाठीही स्मार्टफोनचा (smartphone) आधार घेतला. मात्र आता हीच गॅजेट्स मुलांसाठी मोठा धोका ठरत आहेत. मुल आता या गॅजेट्सचा उपयोग सोशल मीडियाच्या (social media)वापरासाठी करत आहेत. फेसबूक,इन्स्टाग्रामचा वापर खूप वाढला आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यांची तब्येत (side effect on health) खराब होत आहे. सोशल मीडियाच्या अति वापरामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर (mental health) धोकादायक परिणाम होत आहेत.

स्मार्ट फोनच्या व्यसनामुळे मुले हिंसक होत असून त्यांच्या झोपेच्या पद्धतीत बिघाड झाला आहे. अनेक मुलं बऱ्याच वेळेस आई-वडिलांपासून लपवूनही सोशल मीडियाचा वापर करत असतात.

इंग्लंडमधील डी मॉन्टफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, वयाच्या 10 व्या वर्षी मुलांची सोशल मीडियावरील सक्रियता झपाट्याने वाढली आहे. ही मुलं दररोज सुमारे पाच तास सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यासाठी दिवसभरात तीन तास तर रात्री दोन तास खर्च होतात.

सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे लहान मुलं प्रसिद्ध व्यक्तींमुळे प्रभावित होतात आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटला फॉलो करतात. तसेच मुलांना आपले इतर मित्र काय करतात हेही जाणून घ्यायचं असतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट रहायचं असतं.

अनेकदा गेम खेळण्यासाठीही मुलांकडून स्मार्ट फोनचा वापर केला जात आहे. मुलांना गेम खेळण्याचे व्यसन लागल्यामुळे ते तासनतास फोनवर घालवत असल्याची अनेक प्रकरणं पाहायला मिळत आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थित असताना हे प्रकार अधिक घडत आहेत.

या संशोधनात सहभागी झालेल्या वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, 10 वर्षांपर्यंतच्या मुलांवर संशोधन करण्यात आले. त्यांच्याकडे स्वत: चा (पर्सनल) फोन होता. जगभरात काय घडत आहे, आपले मित्रमंडळी काय करत आहेत, हे त्या मुलांना सोशल मीडियाद्वारे जाणून घ्यायचे होते.

सोशल मीडियाच्या व्यसनामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राज कुमार यांच्या मते, मुलं वारंवार आपले फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटचे न्यूज फीड तपासतात.

अनेक वेळा तर असे होते की ते दर 10 ते 15 मिनिटांनी हे करत राहतात. सोशल मीडियावरील ही अकाउंट्स पुन्हा पुन्हा बघण्याची ही सवय मानसिक स्वास्थ्य बिघडवू लागते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, Fear of missing out (FOMO) चा धोकाही वाढतो. ही मुलं सोशल मीडियाच्या जगाकडे वास्तवातील जीवन म्हणून पाहू लागतात.

सोशल मीडियाच्या वापराव्यतिरिक्त मुलांमध्ये गेम खेळण्याचे व्यसनही लक्षणीयरित्या वाढलं आहे. गेल्या काही महिन्यांत देशभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत की, मोबाईलवर गेम खेळण्यास परवानगी दिली नाही म्हणून मुलाने आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीची हत्या केली.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मोबाईलवरील गेमच्या व्यसनामुळेही मुलांची विचार करण्याची क्षमता कमकुवत होत आहे. अनेकदा मुले खेळाचा भाग म्हणून बाहेरच्या जगाचा विचार करू लागतात आणि स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतात. गेम खेळल्यामुळे मुलांमध्ये झोपेचा आजारही होत आहे.

सोशल मीडियाच्या वाढत्या व्यसनामुळे मुलांची शारीरिक हालचाल कमी होत आहे. शाळेतून आल्यानंतर मुलं बहुतांश वेळ फोनवरच घालवतात. शारीरिक हालचालीच्या अभावामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. कंबरदुखी आणि थकवा येणे, अशा समस्या मुलांमध्ये दिसून येत आहेत.

या सर्वांमध्ये मुलांमधलं सोशल मीडियाचं वाढतं व्यसन कसं कमी करता येईल, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. कारण आतापासूनच हा प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली नाहीत तर भविष्यात हे व्यसन मोठा धोका ठरू शकतो.

याबाबत डॉ. राजकुमार यांनी सांगितले की, हे व्यसन सोडवण्यासाठी पालकांनी मुलांच्या दैनंदिन कामांवर लक्ष ठेवायला हवं. मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कामांसाठी फोन किंवा लॅपटॉप देऊ नये.

तसेच त्यांच्या फोन वापराची एक वेळ निश्चित करा. जर तुमच्या मुलांच फोनवर काहीही काम नसेल तर त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

मुलांना बाहेर खेळण्याची सवय लावा, रोज संध्याकाळी त्यांना मैदानावर किंवा बागेत खेळायला घेऊन जावे. त्याची शारीरिक हालचाल, ॲक्टिव्हिटी वाढली, तर मुलांचा फोनचा वापर आपोआप कमी होत जाईल.

मुलं घरात सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे तुम्ही पाहिले तर ते बंद करा आणि त्यामुळे होणारे नुकसान, याबद्दल मुलांना मार्गदर्शन करा.

मोकळ्या वेळेत मुलांना काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा द्या. तुम्ही त्यांना डान्स क्लास किंवा स्विमिंगसाठी नेऊ शकता. मुलांना फावल्या वेळात फोनपासून दूर ठेवा आणि त्यांच्याशी बोत रहा. दिवसभर काय केले याबद्दल गप्पा मारा.

3 मे १९१३ रोजी चित्रपट सृष्टीला चालना मिळाली. तसेच अनेक चित्रपट पडद्यावर दिसू लागले. १९ व्या शतकात चित्रपटांना काही श्रेणी देण्यात आल्या होत्या. त्या श्रेणींना केन्द्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड या प्रमाणपत्राद्वारे जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे कोणता चित्रपट कोणत्या वयातील लोकांसाठी आहे हे समजते आणि मुलांना काय बघू द्यावे व काय बघू देऊ नये हेही कळते.

केन्द्रीय फिल्म प्रमाणन बोर्डात चित्रपटांच्या ४ मुख्य श्रेणी आहेत त्या बद्दल आधी जाणून घेऊया:

१) अ (अनिर्बंधित) या U- या श्रेणीचा अर्थ असा आहे की, हे चित्रपट सगळ्या वयोगटातील व्यक्ती पाहू शकतात.

२) अ/व या U/A- या श्रेणीतील चित्रपटात काही हिंसा जनक किंवा अश्लील भाषेचा वापर केलेला असून या श्रेणीतील चित्रपट केवळ १२ वर्षाच्या वयोगटातील मुलं पालकांच्या उपस्थितीमध्ये बघू शकतात.

३) व (वयस्क) या A - ही श्रेणी फक्त तरूणांसाठी आहे. म्हणजेच १८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगातील व्यक्तींसाठी पात्र आहे.

४) वि (विशेष) या S- ही विषेश श्रेणी आहे. या श्रेणीतील चित्रपट फक्त डॉक्टर्स किंवा इंजिनिअर इत्यादींसाठी बनवलेली आहे.

वरील प्रमाणे "व/A" या श्रेणीचे जे महत्त्व सांगितले आहे, ते आजच्या तरूणांना त्याचा काही फरक पडत नाही. कारण आजकाल या तिसर्‍या श्रेणीतील चित्रपट म्हणजेच वयस्क श्रेणीतील चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही पाहू शकते. व/A याचा अर्थ असा आहे की ते १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी चित्रपट नाहीत. तरी आजकाल ते सहज रित्या टेलिव्हिजनवर किंवा थिएटर मध्ये दाखवल्या जातात. आजकाल सगळीच पिढी चित्रपटांची शौकीन झाली आहे. ते लहान असो किंवा मोठे, वयाचं बंधन बांधलेलं असूनही हे चित्रपट बघतात आणि याचाच परिणाम तरूण पिढीवर भयंकर झाला आहे.

याची सत्य परिस्थिती पाहुया. एक सुखी कुटुंब आणि वयात आलेला मुलगा घरी कसा वागत असतो...

समीर प्रौढ अवस्थेत आला होता. घरी एकदम छान चालत असताना त्याला मित्रांसोबत राहून अनेक गोष्टींची सवय लागली होती. अभ्यासात गुंतून राहणारा चिन्मय लपून छपून मोबाईल वापरायला लागला होता. घरी आईने विचारलं असता काही ना काही कारण काढून तो टाळायचा आणि उलट उत्तर देऊन निघायचा. असंच रात्र-बेरात्री तो जागा राहुन मोबाईलवर अनेक प्रकारचे चित्रपट पाहू लागला तर कधी मित्रांसोबत अभ्यास करायला जातो असं सांगून तो त्यांच्या सोबत मोबाईलवर अनेक विडिओ पाहू लागला होता. मोबाईलद्वारे त्याने अनेक चित्रपटांची नावं शोधून काढली होती.

असेच काही दिवसांनी लेट नाईट स्टडीजचा बहाणा करून तो बाईकवर दारू पिऊन स्टंअंट मारणं, सिगारेट ओढणे हे चालू केलं होतं. हळू हळू तो व्यसनाच्या आहारी जाऊ लागला होता. चित्रपटात पाहून तो आणि त्याचे मित्र नवं-नवीन गोष्टींच्या आहारी जात होते. घरातही घरच्यांना न जुमता या गोष्टी करायला चालू केल्या होत्या. अशातच तो आणि त्याचे मित्र रेव्ह पार्टीत जाऊ लागले आणि त्यांना महाभयंकर गोष्टीची चटक लागली. तो आणि त्याचे मित्र ड्रग्सच्या अधीन झाले. अमली पदार्थांचे सेवन करून ते अश्लील चाळे करू लागले. चित्रपट पाहून चिन्मय तेच जीवन खऱ्या आयुष्यात जगू पहात होता.

आजकाल चित्रपटांत अश्लील व्हिडिओ क्लिप किंवा अश्लील शब्दाचा वापर सहज रित्या दाखवला जातो. याचा परिणाम समाजातील तरुण पिढीवर नक्कीच होत चालला आहे. आजच्या चित्रपटांमध्ये लोकांना हवी असलेली सवंग दर्जाची करमणूक हिंसा, लैंगिकता, अश्लीलता या गोष्टींकडे जास्त वळलेली आहे. इतकंच नव्हे तर अशा काही चित्रपटांमुळे बलात्कार, अश्लील भाषा, क्रुरपणाचे तपशील चित्रिकरण वाईट रित्या होत आहेत.

चित्रपटात नायक दाखवला जातो तो व्यसनाच्या आहारी असतो तसेच बेकायदेशीर गुन्हांमध्ये गुरफटलेला असतो म्हणजे या सगळ्या गोष्टी चित्रपटात सहज चालतात. हेच पाहून तर आजची तरूण पिढी हाच विचार करून त्याचं निरसन करते. हिंदी चित्रपटातील प्रेमचित्रीकरणामुळे आताच्या तरूण पिढीवर एवढा प्रभाव पडला आहे की ते गुंडगिरी किंवा अॅसिड अटॅक करण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. मारामारीचे अड्डे, शिक्षण सोडून प्रेमाचे आखाडे, धांगडधिंगाणा हेच काय ते आजची तरूण पिढी आपलं आयुष्य मानू लागली आहे. चित्रपटात या सगळ्या गोष्टी जरी मनोरंजन हेतू बनवल्या जात असल्या तरी या सगळ्या गोष्टींचा परिणाम आताच्या तरूण पिढीवर सहज रित्या होऊ लागला आहे. त्यांचा समजच झाला आहे की चित्रपटात जसे जगतात तसे आपणही जगू आणि हीच मोठी गोष्ट तरूण पिढीला घातक ठरली आहे. अन् खरतर फक्त हिंदी नाही त्याच्या जोडीला मराठी, बंगाली, कन्नड, पंजाबी, गुजराती असे अनेक भाषेचे चित्रपट प्रकशित होतात ज्यामुळे तरूणपिढीच्या आयुष्याचं खूप नुकसान होत चाललं आहे.

आजकालच्या चित्रपटांच्या जबरदस्त परिणामांमुळे समाजातील प्रामाणिकपणाला, मेहनती वृत्तीला आळा बसला आहे. तसेच चित्रपटातील श्रीमंतीच्या प्रदर्शनाने अनेक तरूणांच्या मनात लालसा निर्माण होत चालली आहे. अनेक गैरकानूनी धंदे दाखवले जातात तर ते पाहून आजच्या तरूण पिढीतील तरुण त्या मार्गाने जाऊ इच्छितात. चित्रपटाच्या माध्यमातून जे काही दाखवलं जातं ते तरूण पिढी सोबत उगवत्या पिढीसाठी घातकच ठरतंय आणि हीच गोष्ट नैराश्यजनक आहे.

चित्रपटांचे चर्चा साप्ताहिक काढले जातात. वर्तमानपत्रात छापून येतात. समस्त वयोगटातील व्यक्ती वाचतात पण तोच चित्रपट न बघण्यासारखा असेल तर तोच चित्रपट पाहण्याचा अट्टाहास ही तरूण पिढी करते. यामुळेच समाजात चंगळवादी, अनैतिकता, हिंसाचार, लैंगिक अत्याचार बळावत चालले आहे. चित्रपटांच्या नावाखाली याचा तरुणांवर विपरीत परिणाम होत चालला आहे.

व्यसनाधीतचे उद्दातिकरण असेलेले चित्रपट पाहुन अनेक तरूण पिढी आजच्या मायावी जगात संस्कारांपासून लांब राहत चालली आहे. जसं की तो मुलगा किंवा मुलगी घरात आई-बाबांसोबत एक असतात. अन् बाहेर गेल्यावर काही वेगळंच वागतात. आपण बोलतो ना "दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं." अशीच गोष्ट तरूणांसोबत घडत आहे. घरातल्यांना वाटत असतं की आपली मुलं खूप सोज्वळ, सुसंस्कृत, संस्कारी आहेत. पण तिच मुलं जेव्हा घरा बाहेर पडतात आणि कट्ट्यावर बसून किंवा नाक्यावर बसून कसे चालू करतात ते समाजाला दिसून येतंच असतं. टवाळगिरी करणं, रस्त्यात वयस्कर लोकांची टिंगल उडवणं, मुलींची छेड भर रस्त्यावर काढणं या सगळ्या गोष्टींचं आत्मचिंतन चित्रपट पाहून आणि मोबाईलवर सिरीज पाहून होतं असतं. आजकाल तरूणांच्या हातात सहज मोबाईल मिळून जातात. पण त्याचा वापर ते कशाप्रकारे करतात त्याचा पत्ता कोणाला नसतो. या सगळ्या गोष्टींना बळी आजकालची मुलंच नाही तर मुली सुद्धा आहेत. अनेक मुली अल्कोहोल, सिगारेट आणि कित्येक अमली पदार्थांच्या आहारी जातात. त्याच कारण पण आहे की चित्रपटांमध्ये नायिका पब मध्ये जाऊन अल्कोहोलच सेवन करते आणि सिगारेट ओढत असते. तर आता मुलींना पण वाटू लागते की हे करतात तर आपणही एकदा घेऊन पाहू आणि असं करून त्यांना त्या गोष्टींची चटक लागते. चित्रपट पाहून अनेक तरूण व्यसनाच्या अधीन होतात आणि इथूनच विपरित परिणामची सुरूवात तरुणांवर व्हायला चालू होते.



Comments

Popular posts from this blog