naralache niyojan coconut plant cultivation planning

नारळ हे बागायती फळझाड आहे, पाण्याची सोय झाल्यास कुठल्याही प्रकारच्या जमीनीत लागवड करता येते. 

नारळासाठी खड्डा भरणे:

सर्वसाधरण 1x1x1 मीटर आकारचे खड्डे खोदा.खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिने आधी पूर्ण करावेत. रेताड, वरकस आणि मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळाशी कमीत कमी 1 ते 2 टोपल्या चागल्या प्रतीची माती टाकावी. खड्डा भरताना आणखी 1 ते 2 टोपल्या चांगल्या प्रतीची माती मिसळावी. त्यामुळे जमिनीत माती धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

पावसाळ्यात अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी जमिनीत खड्ड्याच्या तळाला 1 ते 2 टोपल्या रेती (वाळू) घालावी. तसेच खड्डा भरताना 1 ते 2 टोपल्या रेती मिसळावी, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करता येईल. खड्डा भरताना वरील थरात चांगली माती/वाळू 4 ते 5 घमेली कुजलेले शेणखत/कंपोस्ट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्पेट, 100 ग्रॅम फॉलीडॉल पावडर खड्डा वापरून खड्डा पूर्ण भरावा. पाणी साचून राहत नसलेल्या जमिनीत पृष्ठभागापर्यंत भरावा. परंतु पाणी साचणाऱ्या जमिनीत उंचवटे करावेत. लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत रोपे खात्रीशीर रोपवाटीकेतूनच खरेदी करावीत.

नारळाचे खत व्यवस्थापन:

नारळ झाडे खताला चांगला प्रतिसाद देतात. झाडापासून उत्पादन कमी मिळणे, वाढ खुरटलेली राहणे, नारळ फळांना तडे जाणे , फळामध्ये बुरशी धरणे, फळे लहान असतानाच मोठ्या प्रमाणात गळ होणे. यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांना होणारा अपुरा अन्नपुरवठा होय. अनेक वेळा झाडांना फक्त शेणखत अथवा युरिया खतच दिले जाते, हे अयोग्य आहे. नारळ झाडास नत्र, स्फुरद आणि पालाश अशा तिन्ही अन्नघटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे महत्वाचे आहे. 

5 ते 6 वर्षाच्या नारळाच्या झाडास 50 किलो शेणखत, दोन किलो युरिया, तीन किलो सिंगल सुपर फॉस्पेट आणि साडेतीन किलो म्यूरेट ऑफ पोटॅश तीन समान हफ्त्यात द्यावे. (जून-सप्टेंबर व फेब्रुवारी) पैकी संपूर्ण शेणखत व सिंगल सुपर फॉस्पेट जून महिन्यातच एकाच वेळी द्यावीत. रोपे लावल्यानंतर पहिल्या वर्षी रोपांची मुळे 30 से.मी.अंतरापर्यंत सभोवती विखरून टाकावीत आणि खुरप्याच्या सहाय्याने मातीत मिसळावी. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खते देताना 30 से.मी.अंतर वाढवत जावे व पाचव्या वर्षी व त्या पुढे 1.5 ते 1.80 मीटर पर्यंतच्या अंतराने ती पसरून टाकावीत आणि ती मातीत मिसळावी.

नारळाच्या झाडास वयोमानानुसार द्यावयाची खत मात्रा

नारळाच्या झाडाचे वय (वर्ष)

शेणखत/कंपोस्ट खत (किलो/झाड)

रासायनिक खत मात्रा (ग्रॅम प्रती झाड प्रती वर्ष)

नत्र (युरिया )

स्फुरद (एसएसपी)

पालाश (एमओपी)

१०

२०० (४३४)

१०० (६२५)

४०० (६६८)

२०

४०० (८६८)

२०० (१,२५०)

८०० (१,३३६)

३०

६०० (१,३०२)

३०० (१,८७५)

१,२०० (२,००४)

४०

८०० (१,७३६)

४०० (२,५००)

१,६०० (२,६७२)

५०

१,००० (२,१७०)

५०० (३,१२५)

२,००० (३,३४०)

(  ) कंसातील आकडे हे खतांच्या मात्रा दर्शवितात

Comments

Popular posts from this blog