Posts

Showing posts from August, 2021

बाबांना समर्पित कविता

जुने गाणे ऐकताना बाबा मी तुम्हाला माझ्यामध्ये अनुभवतो || ड्रायव्हिंग करताना तुमचे माझ्यावर असलेले नियंत्रण बाबा मी नेहमी अनुभवतो || कोणत्याही लहान बाळाला त्याच्या आजोबांसोबत खेळताना बघतो त्यावेळी मी तुमची कमी खूप अनुभवतो || तुम्हाला स्वतःचं व दुसर्याचही भविष्य माहीत होतं हे आता दैनंदिन आयुष्यात मी अनुभवतो || प्रत्येक कार्यात यश हा तुमचा विश्वास बाबा मी सर्वत्र अनुभवतो || माझं बाळ जेंव्हा माझ्या अंगाखांद्यावर खेळतं, तेंव्हा तुम्हाला मी माझ्यात अनुभवतो || बाळाच्या "बाबा" हया हाकेला बाबा मी तुम्हाला माझ्यात अनुभवतो || घरातील प्रत्येक जागेत उठता बसता तुमचा सहवास सतत मी अनुभवतो || तुम्हीच लावलेल्या झाडांना पाणी घालताना त्या झाडांमध्ये देखील मी तुम्हाला अनुभवतो|| घरगाडा हाकताना पै पै चा व्यवहार करताना बाबा तुम्हाला मी  माझ्यात अनुभवतो|| माझ्या छोट्या छोट्या यशात माझ्या बाजूलाच मनोमन आनंदित होताना तुम्हाला मी अनुभवतो|| दररोज अरश्यासमोर उभे राहताना माझ्या समोर तुम्हाला मी माझ्यात अनुभवतो|| कितीही त्रास अवहेलना झाली तरीही निश्चल मनाने पुढे जाताना माझ्यात मी तुम्हाला अनुभवतो|| सगळ्यांच...