बाबांना समर्पित कविता

जुने गाणे ऐकताना बाबा मी तुम्हाला माझ्यामध्ये अनुभवतो ||
ड्रायव्हिंग करताना तुमचे माझ्यावर असलेले नियंत्रण बाबा मी नेहमी अनुभवतो ||
कोणत्याही लहान बाळाला त्याच्या आजोबांसोबत खेळताना बघतो त्यावेळी मी तुमची कमी खूप अनुभवतो ||
तुम्हाला स्वतःचं व दुसर्याचही भविष्य माहीत होतं हे आता दैनंदिन आयुष्यात मी अनुभवतो ||
प्रत्येक कार्यात यश हा तुमचा विश्वास बाबा मी सर्वत्र अनुभवतो ||
माझं बाळ जेंव्हा माझ्या अंगाखांद्यावर खेळतं, तेंव्हा तुम्हाला मी माझ्यात अनुभवतो ||
बाळाच्या "बाबा" हया हाकेला बाबा मी तुम्हाला माझ्यात अनुभवतो ||
घरातील प्रत्येक जागेत उठता बसता तुमचा सहवास सतत मी अनुभवतो ||
तुम्हीच लावलेल्या झाडांना पाणी घालताना त्या झाडांमध्ये देखील मी तुम्हाला अनुभवतो||
घरगाडा हाकताना पै पै चा व्यवहार करताना बाबा तुम्हाला मी  माझ्यात अनुभवतो||
माझ्या छोट्या छोट्या यशात माझ्या बाजूलाच मनोमन आनंदित होताना तुम्हाला मी अनुभवतो||
दररोज अरश्यासमोर उभे राहताना माझ्या समोर तुम्हाला मी माझ्यात अनुभवतो||
कितीही त्रास अवहेलना झाली तरीही निश्चल मनाने पुढे जाताना माझ्यात मी तुम्हाला अनुभवतो||
सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे बाबा, प्रत्येक औषधात मी तुम्हाला अनुभवतो||
सर्वत्र सम्पूर्ण नाव सांगताना तुम्ही माझ्या सोबत असल्याचे मी अनुभवतो||
देवपूजा करताना जप करतांना तुमचा आशीर्वाद मी रोज अनुभवतो||
प्रत्येक क्षणात तुम्हला आठवताना कंठ दाटून येतो तरीही भावना आवरताना मी तुम्हाला माझ्यात अनुभवतो||


 तुम्हाला मी माझ्यात अनुभवतो,  ||
*बाबा* तुम्हाला मी माझ्यात अनुभवतो ||

Comments

Post a Comment

Popular posts from this blog