hanuman arti hanumantachi arti हनुमंताची आरती

 सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।। करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।।
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।
थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।
रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।।

Comments

Popular posts from this blog