Teachers day speech शिक्षक दिनाचे माझे मनोगत

Teachers day speech
 

 

 आज सकाळी व्हाट्सएप सुरू केले आणि सगळे मेसेज गरगर डोळयांसमोर फिरू लागले. माझा फोन हँग नाही पडला 😜 कारण फोनचा प्रोसेसर भारी आहे न. खूप R & D करून घेतला होता न फोन. 😄

असो आज शिक्षक दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला, आणि मन भरभरून 😍 आले. जगभरात त्रिकालाबाधित एक वाक्य आहे "teaching is the Nobel Field" म्हणजे शिक्षकी हे एक सन्माननीय आणि पवित्र क्षेत्र आहे. 

 मी आधी IT क्षेत्रातील नामांकित इन्फोसिस ह्या कम्पणीत काही काळ सेवा केली आणि आयुष्याला एक वळण आले व मी इन्स्टिट्यूट, ट्युशन आणि कॉलेज ला एका प्राध्यापकाच्या नात्याने शिक्षकी क्षेत्रात आलो. का कोणास ठाऊक पण मनात भीती कधीच नव्हती, स्टेज डेरिंग सहज झाले मी विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद करू लागलो. मी माझ्या घरातील सदस्यांप्रमाणे विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे सम्बन्ध निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो. मी हे ठरवून ठेवले होते की जे काही मला येते ते सर्व विद्यार्थ्यांना मी देईन आणि त्यांच्याशी सर्व शेअर करेन. शिक्षकाचे कर्तव्य देखील हेच आहे. 

पण फक्त शिकवणे एवढेच न करता चहूबाजूने मार्गदर्शन तसेच आर्थिक शैक्षणिक सामाजिक पद्धतीने मदत करण्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना भेटले नाही आणि बोलणे नाही झाले की कसे रिकामे रिकामे वाटायचे. विचारांची मुद्द्यांची विषयांची सर्व प्रकारची देवाणघेवाण व्हायची, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत होतो. शिकवण्याच्या बाबतीत काही विद्यार्थीनी माझी तुलना गुगल शी केली, आणि जिव्हाळ्याचे सम्बन्ध असे की काहींनी स्वतःचा मोठा भाऊ मानले. 

एकदा एक विद्यार्थी भेटला आणि त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती त्याला नोकरीची नितांत गरज होती, मी माझ्या मित्राला फोन करून सांगितले आणि त्या मुलाला पाठवले. काही दिवसांनी तो विद्यार्थी घरी आला आणि घरातील सर्वांच्या समोर माझ्या पाया पडला ,त्याच्या डोळ्यात पाणी होते. माझे मन भरून आले व मला समाधान वाटले की चला माझ्या हातून काही तरी चांगले घडलेले आहे. थोडे बोलणे झाले आणि तो विद्यार्थी गेला. तत्क्षणी माझ्या वडिलांना माझ्या आजोबांसोबत घडलेल्या एका क्षणाची आठवण झाली. माझे आजोबा शिक्षक म्हणून  निवृत्त झाले होते आणि आम्ही बस स्टँडवर उभे होतो बसची वाट पाहत आणि तितक्यात लाल दिव्याची एक गाडी येऊन समोर थांबली. त्यातून एक अधिकारी उतरला आणि माझ्या आजोबांच्या पायावर डोके ठेवले, सर्व लोक बघत होते, आजोबांनी त्या अधिकाऱ्याला गळ्याशी लावले ,थोडे बोलणे झाले आणि तो अधिकारी गेला.नंतर कळले की ते व्यक्ती आमच्या तालुक्याचे तहसीलदार आहेत. हे भावनिक क्षण एक शिक्षक आयुष्यभर अनुभवत असतो.

माझ्या लग्नात बोलवता आले नाही म्हणून माझ्यावर रुसणारे विद्यार्थी आणि माझ्या बहिणीच्या लग्नात मदतीला येणारे विद्यार्थी, हे सर्व एक परिवार असण्याचेच तर लक्षण आहे. मी नेहमी विषयाच्या बाहेर जाऊन जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तस करावा हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह देखील असतो. पण आज असे जाणवते की समाज भरकटत आहे, द्वेषाची भावना पसरत आहे, राजकारणाच्या नादी लागून जातिद्वेषाला तरुण पिढी बळी पडत आहे. अश्या परिस्थितीत माझ्यातला सत्यशोधक शिक्षक जागा होतो. आणि तो शिक्षकच काय जो  सत्य समोर आणत नाही. हे काम देखील मी चोख बजावण्याचा प्रयत्न करतो. शिक्षक स्वतःच एक क्रांतिकारी संस्था आहे.

चंद्रगुप्त ला अखंड भारताचा सम्राट बनवणारे आचार्य चाणक्य महान, शिवरायांना मार्गदर्शन करणारे समर्थ रामदास स्वामी, स्त्री शिक्षणासाठी झटणारे ज्योतिबा व सावित्रीबाई ,बाबासाहेबांना आडणावासाहित मुलाप्रमाणे प्रेम देणारे आंबेडकर गुरुजी, एक आदर्श शिक्षक जो नन्तर राष्ट्रपती झाला म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन, असे अनेक महान शिक्षक होऊन गेले, त्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन 🙏🕉️. 

संस्कृतमध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे :
💐💐💐💐💐
प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा।
शिक्षको बोधकश्वैव षडेते गुरवः स्मृताः॥
💐💐💐💐
जो प्रेरणा दे, सूचना दे, पाठ करे, मार्गदर्शन करे,
शिक्षा दे, और बोध कराए, ये छः गुरु माने गये हैं।
💐💐💐💐💐


आपल्याला प्रत्येक गोष्टीतून काही न काही शिकायला मिळते मग ते व्यक्ती असो वस्तू असो प्राणी असो निसर्ग असो वा वनस्पती असो, हे सर्व आपले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिक्षकच असतात. ज्यांनी मला आजपर्यंत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष काही न काही शिकवले आहे तसेच फसवणारे धोका देणाऱ्यानी सुद्धा मला जीवनाचे धडे दिले आहेत, मला घडवणारे माझे आई वडील आणि माझे हे सर्व विश्व निर्माण करणाऱ्या 🕉️🚩 परमेश्वरास माझा कोटी कोटी प्रणाम. 

आज मला शुभेच्छा देणारे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा स्नेही जणांचा मी आभारी आहे, तुमच्या शुभेच्छा मला अजून चांगले कार्य करण्याची प्रेरणा देतात आणि कायम तुमच्यासाठी उकृष्ट करतच राहीन हा माझा तुम्हाला शब्द.

तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम 😘😘

Comments

Post a Comment

Popular posts from this blog