Posts

Showing posts from September, 2020

Teachers day speech शिक्षक दिनाचे माझे मनोगत

Image
Teachers day speech      आज सकाळी व्हाट्सएप सुरू केले आणि सगळे मेसेज गरगर डोळयांसमोर फिरू लागले. माझा फोन हँग नाही पडला 😜 कारण फोनचा प्रोसेसर भारी आहे न. खूप R & D करून घेतला होता न फोन. 😄 असो आज शिक्षक दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला, आणि मन भरभरून 😍 आले. जगभरात त्रिकालाबाधित एक वाक्य आहे "teaching is the Nobel Field" म्हणजे शिक्षकी हे एक सन्माननीय आणि पवित्र क्षेत्र आहे.   मी आधी IT क्षेत्रातील नामांकित इन्फोसिस ह्या कम्पणीत काही काळ सेवा केली आणि आयुष्याला एक वळण आले व मी इन्स्टिट्यूट, ट्युशन आणि कॉलेज ला एका प्राध्यापकाच्या नात्याने शिक्षकी क्षेत्रात आलो. का कोणास ठाऊक पण मनात भीती कधीच नव्हती, स्टेज डेरिंग सहज झाले मी विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद करू लागलो. मी माझ्या घरातील सदस्यांप्रमाणे विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे सम्बन्ध निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो. मी हे ठरवून ठेवले होते की जे काही मला येते ते सर्व विद्यार्थ्यांना मी देईन आणि त्यांच्याशी सर्व शेअर करेन. शिक्षकाचे कर्तव्य देखील हेच आहे.  पण फक्त शिकवणे एवढेच न करता चहूबाजूने मार्गदर्शन तसेच आर्थिक शैक्षण