Posts

naralache niyojan coconut plant cultivation planning

नारळ हे बागायती फळझाड आहे, पाण्याची सोय झाल्यास कुठल्याही प्रकारच्या जमीनीत लागवड करता येते.  नारळासाठी खड्डा भरणे: सर्वसाधरण 1x1x1 मीटर आकारचे खड्डे खोदा.खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिने आधी पूर्ण करावेत. रेताड, वरकस आणि मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळाशी कमीत कमी 1 ते 2 टोपल्या चागल्या प्रतीची माती टाकावी. खड्डा भरताना आणखी 1 ते 2 टोपल्या चांगल्या प्रतीची माती मिसळावी. त्यामुळे जमिनीत माती धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पावसाळ्यात अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी जमिनीत खड्ड्याच्या तळाला 1 ते 2 टोपल्या रेती (वाळू) घालावी. तसेच खड्डा भरताना 1 ते 2 टोपल्या रेती मिसळावी, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करता येईल. खड्डा भरताना वरील थरात चांगली माती/वाळू 4 ते 5 घमेली कुजलेले शेणखत/कंपोस्ट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्पेट, 100 ग्रॅम फॉलीडॉल पावडर खड्डा वापरून खड्डा पूर्ण भरावा. पाणी साचून राहत नसलेल्या जमिनीत पृष्ठभागापर्यंत भरावा. परंतु पाणी साचणाऱ्या जमिनीत उंचवटे करावेत. लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या

vitthal Aarti panduranga chi arti आरती विठ्ठलाची

  युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा । पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥ तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥ धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाई राणीया सकळा ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥ ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती । दिण्ड्या पताका वैष्णव नाचती पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती । दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥

sant tukaram maharaj arti श्री तुकारामाची आरती

  आरती तुकारामा | स्वामी  सद्गुरुधामा | सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ || राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले | तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ || तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें | म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें ||  आरती तुकारामा || २ ||

sant dnyaneshwar maharaj arti gnyaneshwar श्री ज्ञानदेवाची आरती

  आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा || धृ || लोपलें ज्ञान जगी |हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |नाम ठेविले ज्ञानी || १ ||  कनकाचे ताट करी |उभ्या गोपिका नारी | नारद तुंबर हो |साम गायन करी || २ || प्रकट गुह्य बोले |विश्र्व ब्रम्हाची केलें | रामजनार्दनी |पायी मस्तक ठेविले | आरती ज्ञानराजा |महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

hanuman arti hanumantachi arti हनुमंताची आरती

  सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।   करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।। गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।। सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।। जय देव जय देव जय हनुमंता ।। तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।। दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।। थरथरिला धरणीधर मानीला खेद ।। कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।। रामी रामदासा शक्तपचा शोध ।। जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।।

shri sukta

  ॥वैभव प्रदाता श्री सूक्त॥ हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्र ​ जाम् । चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१॥   तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥२॥   अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् । श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ॥३॥   कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् । पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥४॥   प्रभासां यशसा लोके देवजुष्टामुदाराम् । पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥५॥   आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः । तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥६॥   उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह । प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥७॥   क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् । अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद गृहात् ॥८॥   गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करी