Posts

Showing posts from March, 2021

शेर शिवराज है कवी कलश कुलभूषण काव्य रचना कविता sher shivraj hai he kavi kailash kavya kavita

इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है। अर्थ:- या ओवीत काही ईतिहासातील उदाहरणे दिली आहे. एकदंर वाईट प्रवृत्तीवर चांगल्या शक्तींचा विजय ह्या ओवित दिसतो. महाराजांची तुलना ईंद्र, प्रभु श्रिराम यांच्या सोबत करण्यात आली आहे. जंभासुर नावाच्या राक्षसाचा ज्याप्रमाणे इंद्राने वध केला, समुद्रावर जसा वडवाग्नी कोसळतो, गर्विष्ठ रावणाचा जसा रघुकुलराज रामचंद्राने नाश केला तसे शिवराय आहेत. पवन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यो सहसबाह पर राम द्विजराज है। वादळ ज्याप्रमाणे मेघांचा नाश करते, मदनाचा ज्याप्रमाणे शंकराने, सहस्त्रार्जुनाचा ज्याप्रमाणे परशुरामाने संहार केला तसे शिवराय सर्व वाईट प्रवृत्तीवचा संहार करतात. दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है। दावाग्नी ज्याप्रमाणे वृक्षांचा नाश करतो, हरिणांच्या कळपावर चित्ता ज्याप्रमाणे तुटून पडतो त्याप्रमाणे विलक्षण गतीने महाराज हल्ला चढवितात. तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है याचा अर्थ, प्रकाश जसा अंधाराचा नाश करतो, कृष्णाने जसा कंसाचा वध केला त्याचप्रमाणे शिवराजा म्लेंच्छांचा नाश करतात, शिवर