sheti dhobali dhobli shimla mirchi niyojan शेतीचे उत्तम नियोजन
रिस्क घेण्याची क्षमता, योग्य पीक निवडण्याची कला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पिकामधुन विक्रमी उत्पादन काढण्याची धमक. या गोष्टी जमल्या ना तर तुमची शेती कधीच लॉस मध्ये जाणार नाही.
आसहि कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला त्या मध्ये सुरुवातीला १००% रिस्क ही असतेच.
आज मिरची च पीक घेत असताना अडचणी खूप आहेत, मेहनत खूप आहे, परंतु ते आलेलं पीक पाहून त्याने दिलेली समृध्दी पाहून आणि त्यामधून मिळणाऱ्या आनंदा पुढे केलेली मेहनत आणि झालेला त्रास काहीच नाही.
या वर्षी मूग काढणी वेळी आलेल्या पावसामुळे पीक होत्याच नव्हतं झालं . कधी नव्हतं एवढं पीक जोमात आलं होतं पण त्या रात्री झालेल्या वादळी पावसामुळे पीक पूर्णपणे भुई सपाट झालं.
मूग पिकावर कोणते पीक घ्यावे तर शिमला मिरची सुद्धा जमते. शिमला म्हटले की फार किचकट पिक द्राक्ष पेक्षा कठीण पिक . नर्सरीतून 11000 रोपे सहज मिळतात.
मग शेताची चांगली तयारी करून घ्यावी शिमला म्हणजे खर्चिक पिकं त्यासाठी मल्चिंग चा वापर बेसल डोस सर्वात महत्त्वाचे असतो त्यानुसार बेडवर पूर्णपणे सर्व खते टाऊन मल्चिंग अंथरुण घ्यावे.
लागवड केल्यानंतर गोलगलगाई च्या थोडा त्रास जाणवतो त्या साठी मिठा चा प्रयोग केरावा त्यांनतर आता खरी परिक्षा असते ती कोळी आणि फुलकिडे च्या नियोजन ची त्यानुसार त्याचें चांगला प्रकारे नियोजन करावे उत्पादन घ्यायचं म्हणजे खताच नियोजन आलं त्यानूसार विद्राव्य खाते आलटून पालटुन द्यावीत 32 ते 35 व्या शिमला च दर्शन होतं आणि 45 ते 47 व्या दिवशी पहिला तोड येतो. त्यांनतर 80 व्या दिवशी अजून तोड येतो, आणि उत्पादन वाढतच जाते.
मग आणखी उत्साह वाढतो.शिमला म्हणजे फळपीक तील अति उत्पादन देणार पीक त्यानंतर निघणारा माल वाढत गेला पण दर उतरत देखील जाऊ शकतात.
पण मानत एक निश्चय करावा की जास्तीतजास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत राहायचा, उत्पन्न वाढत जाते.
पिकं निसर्गामुळे खराब झाली तर शेतकरी हार कधिच मानत नाही.. कारण त्याचा आत्मविश्वास जिवंत असतो.पण पिकं जर आपल्या चुकांमुळे खराब झाली तर आत्मविश्वास संपतो.आणि शेती ही आत्मविश्वासाच्या जिवावरच केली जाते मित्रांनो.म्हणून प्रत्येकाने लढणं स्विकारलं पाहिजे.
आतातर खरी लढाई आहे कारण थंडी मध्ये शिमला ला भुरी नियंत्रण फार महत्त्वाचे असते .भुरी म्हणजे कॅन्सर तो आला की प्लॉट पूर्ण पने उध्वस्त होतो त्यामुळे रोज संध्याकाळी बुडा कडील पानावर लक्ष्य देत राहणे करण तिथुन च सुरुवात होते.
Comments
Post a Comment